Posts

Showing posts from August, 2021

लॉक डाऊन आणि सेतू अभ्यास

Image
लॉक डाऊन आणि सेतू अभ्यास जवळ जवळ दीड वर्ष पूर्ण झाले विद्यार्थी शाळे पासून दूर झाले. कोरोना काळात शिक्षणापेक्षा जीव वाचवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले.T.V वरील बातम्या पाहून तर लोक इतके भयभीत होऊन गेले होते की आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी  सर्व काही त्याग करून आपले कुटुंबातील सदस्य या महामारी तून कसे वाचतील या कडे पूर्ण लक्ष देऊन कार्य करीत होते.पण या सगळ्या समस्या सुटत असताना च सर्वात मोठे संकट नवीन पिढीला त्रासदायक ठरत असल्याचे मत व्यक्त केले गेले,ते म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसाभरपाईची,आणि आम्ही सर्व शिक्षक जे लॉक डाऊन मध्ये ही ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवत होतो ,garahbheti देऊन विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी जी धावपळ करत होतो त्याचे  फळ पाहण्यासाठी सतत काही तरी नवीन पिढीला प्रेरणा देणारे काम तळमळीने करीत होतो.याचे फळ शासन आम्हा शिक्षकांना देतच होतो. सेतू अभ्यास मार्गदर्शन      नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल आणि सर्व विद्यार्थी एकाच वेळी भेटतील असे वाटत होते,परंतु मे महिन्यात दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आणि शाळा सुरू होईल का नाही याची काळजी वाटायल