लॉक डाऊन आणि सेतू अभ्यास

लॉक डाऊन आणि सेतू अभ्यास

जवळ जवळ दीड वर्ष पूर्ण झाले विद्यार्थी शाळे पासून दूर झाले. कोरोना काळात शिक्षणापेक्षा जीव वाचवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाले.T.V वरील बातम्या पाहून तर लोक इतके भयभीत होऊन गेले होते की आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी 

सर्व काही त्याग करून आपले कुटुंबातील सदस्य या महामारी तून कसे वाचतील या कडे पूर्ण लक्ष देऊन कार्य करीत होते.पण या सगळ्या समस्या सुटत असताना च सर्वात मोठे संकट नवीन पिढीला त्रासदायक ठरत असल्याचे मत व्यक्त केले गेले,ते म्हणजे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसाभरपाईची,आणि आम्ही सर्व शिक्षक जे लॉक डाऊन मध्ये ही ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवत होतो ,garahbheti देऊन विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी जी धावपळ करत होतो त्याचे  फळ पाहण्यासाठी सतत काही तरी नवीन पिढीला प्रेरणा देणारे काम तळमळीने करीत होतो.याचे फळ शासन आम्हा शिक्षकांना देतच होतो.

सेतू अभ्यास मार्गदर्शन


     नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल आणि सर्व विद्यार्थी एकाच वेळी भेटतील असे वाटत होते,परंतु मे महिन्यात दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आणि शाळा सुरू होईल का नाही याची काळजी वाटायला लागली.जून महिन्यात 15 तारखेला शाळा सुरू होईल पण तसे काही झाले नाही ,शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी आपापल्या घरी,ही स्थिती निर्माण झाली.नेमके काय मार्ग काढावे 

की सर्व विद्यार्थी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून शैक्षणिक साधन उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि १जुलै  pasun' सेतू अभ्यास ' हा उपक्रम सुरू करण्यात आला.या उपक्रमाचं हेतू साध्य करण्यासाठी NCRT पुणे यांनी ऑनलाईन झूम मीटिंग प्रत्येक जिल्ह्याची घेऊन मार्गदर्शन केले.हा 'सेतू अभ्यासक्रम ' मागच्या इयत्तेवर तयार करून विद्याथ्र्यांची ऑनलाईन 

शिक्षणाने किती तयारी झाली,किती फायदा झाला आणि तोटा कोणाचा झाला याचे  सर्व काही माहिती शिक्षक ,पालक आणि शासन यांना  कळणार आहे.कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत २% विद्यार्थी सधन कुटुंबातील आहे म्हणून ऑनलाईन शिक्षण हे फक्त अश्याच विद्यार्थ्यांना मिळाले ज्यांच्या घरी एक पेक्षा जास्त Android phone आहेत.

 सेतू अभ्यास' या उपक्रमाचं हेतू साध्य करण्यासाठी मार्गदर्शन pr msg he online meeting मध्ये आम्हा शिक्षकांना दिलेला आहे की या लॉक डाऊन chya काळात आपला विद्यार्थी कुठ पर्यंत पोहचला आहे या नवीन शैक्षणिक वर्षात त्याला शैक्षणिक धडे देण्यासाठी कुठून सुरुवात करावी लागेल बरं ते आम्हा शिक्षकांना दिलेला आदर वाटतो.काही विद्यार्थी जे परिस्थिती मुळे ऑनलाईन शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत तर काही ठिकाणी Android मोबाईलचं उपलब्धच नव्हते  ,असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले.garhbheti देऊन विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि याच काळात शिक्षणापेक्षा जीव वाचवण्यासाठी मदत करने हे महत्त्वाचे योगदान द्यावे लागत होते.

सेतू अभ्यासक्रम कृतीपत्रिका वाटप


 सेतू बांधायचा प्रयत्न सुरू झाले मागच्या वर्षी तुम्ही कोणते विषय शिकला आणि नवीन इयतेत त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करणे हे लक्षात घेऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू झाली आहे म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम चा रोज एक घटकावर प्रश्न देऊन विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेतले जात आहेत.किती तयारी झाली आहे आणि आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनींना समाजातील विविध भागात भिन्न भिन्न श्रेणीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी कुठून सुरुवात करावी लागेल ते समजणार आहेत ,समजत आहे.हा उपक्रम १जुलै पासून ते १४ अगस्त पर्यंत म्हणजे ४५ दिवसात पूर्ण वर्षाचे अभ्यास करून घेतले जात आहेत.१५व्या दिवशी चाचणी परीक्षा घेतली जाते.अश्या तीन चाचण्या घेऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरु करायची आहे. प्रत्येक संकट नवीन पिढीला प्रेरणा देणारे ठरत असते.पालक वर्गाला शिक्षणाचे महत्त्व लक्षात येइल.प्रत्येक पालकाने आपल्या पल्याकडे जातीने लक्ष घालून आपल्या पाल्याला शैक्षणिक प्रहवात आणणे गरजेचे आहे म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर पालक सभा घेऊन मार्गदर्शन करावे लागेल 


व या प्रवासात पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करून शिक्षकांचं साथ देणे गरजेचे आहे म्हणून आपण दोन्ही पालक व शिक्षक विद्यार्थी रुपी गाडीचे दोन चाक आहे  म्हणून दोन्ही ने आपल्या विद्याथ्र्याची काळजी घेऊन त्यांचे भविष्य साकारण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल,तेव्हाच विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात टिकून राहील.


शेख कमरुन्नीसा अब्बास 

जी. प.प्रा.शा.लोणी उर्दू

तालुका राहता 

जिल्हा अहमदनगर

Comments

  1. खूप खूप अभिनंदन मॅडम
    आपणास मनपूर्वक शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. Bahot hi bahetrin malumat bataye baji tum ne, k ham teacher bhi kitni mahenat se baccho ki tayari le rahe h.

    ReplyDelete
  3. Bahot khoob
    Aaj ke halat ke mutabiq ek behtrin nizamul amal hai
    Waqiatan aaj is tariqe se mahnat ki zyada zaroorat hai
    Allah aap ki mahnat ko aur tamaam hi asateza k mehnat ko qabool farmaye
    Aap ke jazbaat ko sharfe taraqqi se humkinar farmaye
    Aamin🌹🌹🌹

    ReplyDelete
  4. सेतू अभ्यासा संबंधी खूपच छान & वास्तवदर्शी विवेचन

    ReplyDelete
  5. Nice work mam खूप छान माहिती

    ReplyDelete
  6. Bahot hi bahetrin malumat bataye madam tum ne

    ReplyDelete
  7. खुपच छान !सेतु अभ्यासक्रमावर अतिशय मार्मिकपणे मार्गदर्शन !आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा !

    ReplyDelete
  8. Aslamoalikum baji
    AP hmesha tulba ke future ko sanwarne ke liye fikramand rhte ho Allah mehnat, kamiyabi de

    ReplyDelete
  9. Aslamoalikum baji
    AP hmesha tulba ke future ke liye mehnat krte hai Allah kamrani nasib kre

    ReplyDelete
  10. अभ्यासपूर्वक लिहिलेला उत्तम लेख. छान

    ReplyDelete
  11. Excellent baji
    Allah aapko Kaamiyabi de.

    ReplyDelete
  12. congratulation🤗😇💐💐💐

    ReplyDelete
  13. Asslamualaikum Qamrunnisa Baji, tum ne jo ye mazmun like bahot hi bahetrin likhe h q ki aj k jo halat h is halat me ye birjcourse hi students ho talim se jod kar rakhane ka kam kar rahi h.

    ReplyDelete
  14. लाॅकडाउन आणि सेतू अभ्यासक्रम हा अभ्यासपूर्ण लेख लिहीला याबद्दल अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment